एकीकडे कोरोनाचे सावट पसरले आहे. त्यातच दुसरीकडे मात्र आर्थिक संकट देखील ओढवले आहे. अशा परिस्थितीत अनेकजण चिंतेत आहेत. परंतु लॉकडाऊन नंतर अनेकजण कोरोनापासून सुरक्षित वातावरणात कसा प्रवास करता येईल यावर आता भर देत आहेत. याचा परिणाम ऑटोमोबाईल सेक्टर ला चांगले दिवस आले आहे. ऑटोमोबाईल सेक्टर वर अवलंबून असलेल्या उद्योगक्षेत्राला त्याचा फायदा झाला आहे. दिवाळी, दसरा असल्याने सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये आणखी उद्योगक्षेत्रासाठी चांगले राहील अशी अपेक्षा मसीआचे अध्यक्ष अभय हंचनाळ यांनी व्यक्त केली.
कोरोनाला न घाबरता स्वतः ची काळजी घेऊन अनेकजण आता काम करत आहेत. त्याचाच परिणाम अनेकजण आता स्वतः ची वाहने खरेदी करत आहेत. सोशल डिस्टसिंग पाळण्यासाठी अनेकजण आता वाहन खरेदीवर सर्वाधिक भर देत आहेत. त्याचा परिणाम ऑटोमोबाईल सेक्टरला त्याचा फायदा होत आहे. तसेच या ऑटोमोबाईल सेक्टरवर अवलंबून असलेल्या अनेक कंपन्याना त्याचा फायदा होत आहे. यामुळे आता उद्योगक्षेत्र 60 ते 70 टक्के पूर्वपदावर येत असल्याचे मसीआ चे कार्यकारिणी सदस्य मनिष अग्रवाल यांनी दैनिक सांजवार्ता शी बोलताना सांगितले.
हळूहळू पूर्वपदावर येतय: सतीश लोणीकर
उद्योग क्षेत्र आता पूर्वपदावर येत आहेत. ऑटोमोबाईल सेक्टरला ऑगस्ट महिना चांगला राहिला. सणासुदीचे दिवस असल्याने त्यात यंदा पाऊस देखील चांगला पडला आहे. त्याचा परिणाम सर्वच उद्योगक्षेत्र हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे सीएमआयए चे सचिव सतीश लोणीकर यांनी सांगितले.
वाहन खरेदी वाढली: संतोष माळकर
कोरोनामुळे आता वाहन खरेदी-विक्री होते की नाही याची चिंता होती. परंतु मागील महिन्यात चांगल्या प्रकारे खरेदी ग्राहकांनी केली असल्याचे रघुवीर मोटार्सचे व्यवस्थापक संतोष माळकर यांनी सांगितले. कोरोनामुळे जी वाहन खरेदी थांबलेली होती त्यात 20 टक्के वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात देखील खरेदी वाढेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.